चौफेर न्यूज – आपल्या पण स्वतःचे आणि हक्काचे छोटसे का होईना घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि सरकारने आता हे स्वप्न साकारण्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर सरकारने निर्देशीत केलेल्या नियमांच्या चौकटीत तुम्ही बसत असाल, तर तुम्हाला पहिले घर विकत घेताना मुंद्रांक शुल्क म्हणून फक्त १ हजार रूपये भरावे लागणार असल्यामुळे आता कमी पैसे देऊन आपल्या स्वप्नातील घर विकत घेता घेणार आहे. सर्वसामान्यांमधून सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आनंद व्यक्त केला जातो.

घराच्या रकमेवर ५ टक्के मुद्रांक शुल्क सध्या भरावे लागते आणि ही रक्कम अर्थात काही लाखांच्या घरात असते. पण आता फक्त एक हजार रूपये भरावे लागणार आहेत. पण तुम्हाला हा लाभ घेण्यासाठी काही अटींचे पालन करावे लागणार आहे. या सवलतीसाठी सरकारच्या काही अटीसुद्धा असणार आहे.

त्या अटींनुसार तुम्हाला पहिल्या घरासाठी फक्त रू.१ हजार मुद्रांक शुल्क भरावे लागेल. याचा लाभ ६ लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना घेता येईल. त्यांनाच मुंद्राक शुल्कात सवलत देण्यात येईल. ते घर तुमच्या मालकीचे पहिलेच घर असावे. ३० ते ६० चौरस मिटरच्या घरांनाच याचा लाभ मिळेल. त्याचबरोबर जेथे हे घर घेणार आहात तो गृहप्रकल्प नोंदणीकृत असावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × one =