चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयात आज मनसेच्यावतीने पाणी दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. आज होणार्या महासभेत पाणी दरवाढ करण्याबाबत शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळेच ही दरवाढ करू नये या मागणीसाठी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वात आंगोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना सचिन चिखले म्हणाले की, शहरवासियांचे पाणी चौपट महाग करण्याचा घाट घातला जात आहे. या दरवाढीला मनसेचा पूर्णपणे विरोध आहे. महासभेत सत्तेच्या जोरावर भाजपने दरवाढ केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी सत्ताधारी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen − 9 =