पिंपरी चिंचवड ः रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणाचा मोबाईल फोन दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकाऊन केला. ही घटना बुधवारी (दि. 5) पहाटे वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली.
पराग संजय गायकवाड (वय 21, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) या तरुणाने याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात तीन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पराग बुधवारी पहाटे साडेबाराच्या सुमारास वाल्हेकरवाडी मधील स्पाईन रोडने पायी चालत जात होता. पांढ-या रंगाच्या अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवरून तीनजण आले. त्यांनी परागच्या हातातून जबरदस्तीने दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन हिसकावून नेला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ten + 13 =