भोसरी ः रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणीची दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने पर्स हिसकावून फरार झाला. ही घटना मंगळवारी (दि. 12) रात्री आठच्या सुमारास इंद्रायणी नगर येथे घडली. स्नेहल बाबुराव पवार (वय 25, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी स्नेहल चैतन्य पार्क, इंद्रायणीनगर येथून रस्त्याने पायी जात होती. त्यावेळी दुचाकीवरून अज्ञात चोरटा आला. त्याने बरदस्तीने हिसका मारून स्नेहल यांच्या हातून पर्स हिसकावून नेली. त्यात मोबाईल फोन, रोख रक्कम, आधारकार्ड, पॅनकार्ड, क्रेडिटकार्ड असा एकूण 5 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

11 + ten =