चौफेर न्यूज – मावळ लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या उमेदवारीचे पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काॅंग्रेसने ठराव करुन स्वागत केले. तसेच पार्थ पवारांना खासदार करण्यासाठी मतभेद विसरुन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी केले. तर, पक्षाचे उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

खराळवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिका-यांची शुक्रवारी बैठक पार पडली. यावेळी यावेळी जेष्ठ नेते हनुमंत गावडे, पक्ष प्रवक्ते फजल शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, माजी नगरसेविका शमीम पठाण, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, निलेश पांढरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, राजकारणात प्रत्येकाची इच्छा, आकांक्षा असते. मी स्वत: मावळमधून इच्छूक होतो. परंतू पक्षाने पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. मी सुरूवातीलाच सांगितले होते की, पक्ष जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. पार्थ यांच्या उमेदवारीचे आम्ही स्वागतच करतोय. आता मोठ्या ताकदीने काम करणार आहोत. मावळमध्ये राष्ट्रवादीचाच विजय होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अमित बच्छाव म्हणाले की, मावळ लोकसभा मतदार संघातील जनतेचे प्रलंबित प्रश्न, शास्तीकर माफी ,रिंगरोड, शासकीय रुग्णालयातील अपुर्या वैद्यकीय सुविंधा, आदिवासी समाजातील गरजू प्रश्नाकंडे दुर्लक्ष , शेतक-यांचे प्रश्न , कामगारांच्या अडचणी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या असे जनतेचे महत्वाचे प्रश्न सोडविण्यात विद्यमान खासदार हे पूर्णपणे अपयशी ठरले आहे. ज्याप्रमाणे अजितदादांनी पिंपरी चिंचवड शहराचा कायापलट करून देशपातळीवर पिंपरी चिंचवड हे विकसित शहर अशी प्रतिमा तयार केली, त्याचप्रमाणे पार्थ पवार सुद्धा मावळ लोकसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास करतील असा विश्वास आम्हा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × two =