चौफेर न्यूज – महापालिकेच्या क प्रभागाअंतर्गत महात्मा फुले  पुतळ्यासमोर ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामाच्या रस्ते खोदाईमुळे  बीएसएनएलची केबल तुटल्याने मंगळवारी दुपारी बारापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत पीजे चेंबर्ससह गांधीनगर परिसरातील टेलिफोन व इंटरनेट बंद होते. याबाबत बीएसएनएलला कोणतीही पुर्वसुचना देण्यात आली नव्हती.  पालिकेच्या अशा निष्काळी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी नागरिकांमधून होत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क प्रभागाच्या ड्रेनेज विभागाअंतर्गत पिंपरीतील महात्मा फुले पुतळ्यासमोर ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी मुख्य रस्ता खोदण्यात येत आहे. परंतू, या खोदाईमध्ये बीएसएनएलसह आदी  केबल तुटल्या. यामुळे पीजे चेंबर्स व गांधीनगर परिसरातील बीएसएनएलची केबल तुटून टेलिफोन सेवा व इंटरनेट सेवा बंद झाली होती. पीजे चेंबर्समध्ये विविध वर्तमान पत्रांच्या कार्यालयासह आदी महत्वाची कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयाची टेलिफोन व इंटरनेट सेवा ठप्पा झाली होती. याची खराळवाडीतील भारत संचार निगम लि कार्यालयास माहिती मिळाल्याने बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्वरीत दुरूस्तीचे काम हाती घेतले. परंतू, या कामाची बीएसएनएलला कल्पना दिली. त्यामुळे पालिकेच्या ड्रेनेज विभागाच्या संबंधित अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

याबाबत बीएसएनएलचे खराळवाडी येथील मंडळ अभियंता आर. आर. कातरकी म्हणाले की, महापालिकेने रस्ते खोदाई करण्यापुर्वी बीएसएनएल किंवा अन्य कोणती केबल लाईन गेली आहे का? याची माहिती घेणे गरजेचे आहे. परंतू, पालिकेचे अधिकारी अशी कधीच माहिती घेत नाहीत, अथवा संबंधितांना पुर्व कल्पनाही देत नाहीत. त्यामुळे पालिकेच्या ड्रेनेज खोदाईमुळे बीएसएनएलचे केबल तुटून मोठे नुकसान झाले. तसेच बीएसएनएल ग्राहकांनाही त्रास झाला. यापुढे तरी रस्ते खोदाई करताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × one =