चौफेर न्यूज – – पिंपरी कॅम्पातील अतिक्रमणांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण नियंत्रण विभागाने आज बुधवारी (दि. 5) कारवाई केली. दुकानासमोर वाढविलेले छत, फुटपाथ आणि बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे.

 

महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील पिंपरी कॅम्पात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. कॅम्पातील साई चौक ते गेलॉर्ड चौकाकडे जाणा-या रस्त्यावरील दुकानाच्या बाहेर फुटपाथवर तयार केलेल्या पाय-या, ओटे तयार केले आहेत. त्यामुळे वाहतुकीला व नागरिकांना येण्या-जाण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत. तरिही, अशा प्रकारचे अतिक्रमण दोररोज सुरूच असते. त्यामुळे आज बुधवारी जेसीबीच्या सहाय्याने हे अतिक्रमण काढण्यात आले.

दुकानाच्या शटरला लावलेल्या जाळ्या गॅस कटरने कापून जप्त करण्यात आल्या. त्याचबरोबर  दोन विनापरवाना हातगड्या जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या हातगाड्या नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्डेडियम येथे जमा करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × one =