चौफेर न्यूज – चिंचवड संभाजीनगर येथील पवन शहा याची १९ वर्षाखालील गटात भारतीय क्रिकेट संघामध्ये निवड करण्यात आली आहे. त्याच्या या निवडीने पिंपरी चिंचवड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पिंपळे गुरव येथील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संपर्क कार्यालयात त्याचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, सरचिटणीस प्रमोद निसळ, शहर प्रवक्ते अमोल थोरात, नगरसेवक शत्रुघ्न काटे, सागर आंगोळकर आदी उपस्थित होते. पवन शहा याच्या निवडीमुळे पिंपरी चिंचवड शहरातून विशेष कौतुक केले जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 + 5 =