चौफेर न्यूज –  दोन वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड शहरात ६५ बळी घेतलेल्या स्वाईन फ्लूने यंदाच्या वर्षी पुन्हा आपले तोंड वर काढण्यास सुरूवात केली आहे. शहरात आज स्वाईन फ्लूची लागण झालेले ३ रूग्ण आढळल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन वेगवेगळ्या खाजगी रूग्णालयात या तीन रूग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात या वर्षाच्या सुरूवातीला स्वाईन फ्लूने आपले तोंड वर काढले होते. त्यावेळी एका रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर बदलत्या वातावरणामुळे हा भयानक आजार आटोक्यात आला होता. आता पाऊस आणि वाढत असलेल्या हवेतील गारव्यामुळे स्वाईन फ्लू पुन्हा सक्रीय झाला आहे. आज शहरात एकाच दिवशी स्वाईन फ्लूची लागण झालेले तीन रूग्ण आढळले आहेत. या रूग्णांवर शहरातील दोन खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

१ जानेवारी २०१८ पासून ७ लाख ५५ हजार १२७ रूग्णांची महापालिकेच्या सर्व रूग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३६०४ रूग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. तर वर्षभरात ६ रूग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती. त्यापैकी एका रूग्णाचा जानेवारी महिन्यात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर आज स्वाईन फ्लूची लागण झालेले ३ रूग्ण आढळले आहेत.

दोन वर्षा ६५ बळी घेतलेल्या स्वाईन फ्लू ने यंदाच्या वर्षी शहरात पुन्हा आपला उद्रेक दाखविण्यास सुरूवात केली आहे. बदलत्या वातावरणामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिका प्रशासनाने त्याबाबत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen + 19 =