पिंपरी  पिंपरी चिंचवड शहराचा दिवसाआड पाणी पुरवठा बंद करुन दररोज सुरु करण्यात आला. मात्र, मागील वर्षभरापुर्वी दिवसाला दोनवेळा पाणी पुरवठा करीत होते. आता शहरवासियांना एकवेळ सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. गेल्या चार-पाच दिवसापासून शहरातील सर्व भागातील लोकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा विभागातून कार्यकारी अभियंत्याकडून ठेकेदार पोसण्यासाठी नागरिकांना वेठीस धरले जात आहे. तसेच ठेकेदारांशी अर्थपुर्ण वाटाघाटी करुन पुन्हा दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा घाट घातला जात आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसाआड असलेला पाणीपुरवठा दररोज सुरू करताच विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून शहरात हलकल्लोळ सुरू झाला आहे. वर्षभरापूर्वी दिवसाला दोनवेळा पाणी देणारा पाणीपुरवठा विभाग आता एकवेळही सुरळित पाणीपुरवठा करू शकत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, ठेकेदारांच्या फायद्यासाठी “पाणी अडवा आणि नगरसेवकांची जिरवा” हा फंडा वापरून कृत्रीम पाणीटंचाई निर्माण केली जात आहे.

मागील वर्षात महापालिकेकडून शहरात दिवसातून दोनवेळा पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, राज्यातील दुष्काळ परस्थितीमुळे महापालिकेने पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दिवसातून एकवेळ पाणी सुरू केले. तर, नंतर पाणीकपात आणखी वाढविण्यात आल्याने  दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात पवना धरण 100 टक्के भरल्यानंतर कपात रद्द करून दररोज पाणी पुरवठा करण्याची मागणी वाढू लागली.

काही नगरसेवकांपासून शहरातील आमदार, खासदारांनी कपात रद्द करण्याची मागणी लावून धरली. अखेर पाणीकपात रद्द करून दररोज पाणीपुरवठा सुरू केला. मात्र, दररोज पाणीपुरवठा करताच शहरात विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. दररोज पाणीपुरवठा न करता दिवसाआड पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी हे अधिकारी आणि ठेकेदारांकडून जाणीवपुर्वक कृत्रीम पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याची चर्चा सुरू आहे. त्यात पाणीपुरवठा विभागाने पाणीपुरवठा वितरणासाठी ठेकेदारी पध्दतीने कर्मचारी नेमले आहेत. या ठेकेदारांना आर्थिक फायदा पोहचविण्यासाठी जाणीवपूर्वक पाणीपुरवठा नियोजनात हा घोळ घातला जात असल्याचीही चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × 3 =