चौफेर न्यूज –  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इंन्ट्रेस नागपूरात आहे, तर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांचा पुण्यात आहे. पिंपरी चिंचवडकरांच्या प्रश्नांशी यांना काहीच देणंघेणं नाही.निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वानसे हे विसरलेत. निवडून दिलेल्या आमदारांचे शहरवासियांच्या समस्यांकडे लक्ष नाही. त्यामुळे शहराला आता वालीच उरला नाही अशी टिका राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

भोसरी येथील गावजत्रा मैदान येथे आयोजित हल्लाबोल सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, आमदार जयंत पाटील, शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार बापू पठारे, विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, महापालिका निवडणूकीत वाटलं होतं की शहराशी अनेक वर्षे जवळकीचे नाते होते. शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केले. महापालिका निकालाच्या वेळी जनता विकासाच्या मागे गेली नाही. जनतेने आमचा पराभव केला. शहरात होत असलेले बदल, कचरा समस्या, अनेकांचा हस्तक्षेप पिंपरी-चिंचवडकरांना मान्य आहे का? आयुक्तालयाचा निर्णय झाला. पण त्याचा उपयोग नाही. इथे दहशद असून सरकार, पालकमंत्री पावले उचलताना दिसत नाहीत. शहराला कोणी वाली राहिलेले नाही. रस्त्यांच्या टेंडरची घाई केली गेली. कालवा समितीच्या बैठकीला फक्त पालिकेचे आयुक्त होते. तुमच्या पिण्याच्या पाण्यासाठी बैठकीला हे हजर राहू शकत नाही. भीमा कोरेगावला कायदा सुव्यवस्था सरकारने राखली नाही. तिथे निष्पाप मुलाचा बळी गेला. घरे, दुकाने जाळली. त्यामागचा मास्टरमाइंड कोण, हे कळाले पाहिजे. बैलगाडा शर्यंतीबाबत खासदार, आमदार फक्त भावनांशी खेळत आहेत, अशी टिका त्यांनी केली.

देशाचे राजकारण पवारसाहेबांच्या अवती-भवती फिरत आहे. त्यांच्यासाठी आपले आमदार, खासदार वाढले पाहीजेत. त्यासाठी राष्ट्रवादीचे घड्याळ चालले पाहिजे. शेतक-यांना सरकारने उध्वस्त केले. नीरव मोदी, ललित मोदी हजारो कोटी घेऊन गेले.  देशात महागाई वाढली. रेशनींगला मका देतात. जगात महाराष्ट्रात पेट्रोल महाग आहे. आत्महत्या रोखण्यासाठी काही उपाय करण्याची गरज आहे. मंत्रालय आता आत्महत्यालय झाले आहे. महाराष्ट्र चांद्यापासून बांद्यापर्यंत बिकट अवस्था झाली आहे. उद्योगांना पोषक वातावरण नाही. भोसरीत मैदानाच्या आरक्षणात टप-या टाकून स्थानिक गुंड तेथे हप्ते गोळा करतात. शाळा काढण्याचा परवाना उद्योगपतींना दिला आहे. भारत कुठे स्वच्छ झाला ? हे सरकारने दाखवावे. सरकारमध्ये एकवाक्यता नाही. प्रशासनावर त्यांची पकड नाही. केंद्रात, राज्यात जंगलराज आले आहे.

सत्ता, सत्तेतून पैसा आणि पैसातून सत्ता हे समिकरण सुरू आहे. अनधिकृत बांधकामे, शास्तीकरापासून दिलासा देण्याची इच्छाशक्ती नाही. फडणवीसांना नागपूर, बापटांना पुण्याचे प्रेम आहे.  बापट काहीही बोलतात. भ्रष्टाचाराने बरबटलेले, पण आव वेगळा आणतात.  स्मार्ट सिटीचा पैसा किती आला ? पुण्यात कमळाबाई तिन नंबरला गेली. कुठं नेऊन ठेवलाय भारत, महाराष्ट्र, पिंपरी-चिंचवड आणि भोसरी ? हा प्रश्न उपस्थित करून शिरुरची जागा आलीच पाहिजे. जेवढी ताकद द्या.  फायदा तुमचाच आहे. बेजबाबदार, नाकर्ते सरकार घालवू, असा निश्चय करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

जयंत पाटील म्हणाले, विकासाचं स्वप्न दाखवलं गेलं, लोकांनी भाजपला नव्हे तर मोदींना बघून मतदान केलं. चार वर्षात भाजपने दिलेली खोटी आश्वासने किती खरी झालीत हे जनतेला समजलेयं. जनतेला फसवलं की, जनता आता त्यांना सत्तेत राहून देणार नाहीत. चौकीदार बनवा असं सांगून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले होते. मात्र विजय माल्या, निरम मोदी सारखे अनेक उद्याेगपती करोडों रूपये घेऊन फरार झालेत. मग कसली चौकीदारी करत होते. पावलो पावली थापा मारणारे सरकार आहे, खोटं बोलून सत्तेत आलेत. निवडणुकीपूर्वी केलेले एकही आरोप सिध्द करता आले नाहीत. १६ मंत्र्यांनी केलेले भ्रष्टाचारांना क्लिन चिट मुख्यमंत्र्यांनी दिली. उंदरात भ्रष्टाचार करणारे आमदार तुम्ही निवडून दिलेत. आता तुम्ही विचार करा, राष्ट्रवादीच्या मागे ताकद उभी करा.

चित्रा वाघ म्हणाल्या, बेरोजगारी वाढलीय, घर कसं चालवायचं महिलांपुढे मोठा प्रश्न आहे. रोजगार नसल्यामुळे तरूण गुन्हेगारीकडे वळतोय. रेशन दुकानात धान्याचा पत्ता नाही. गँस महागलाय, स्वयंपाक करणं मुश्किल झालेय. महिलांवरील अत्याचार वाढलेत. कायदा आणि सुवव्यवस्था फक्त कायद्यावरच राहिलीय. या शहरावर अजितदादांनी भरभरून प्रेम केले. पिंपरी चिंचवड दादांचा आत्मा आहे. आज शहराचं चित्र बदललयं, घाणीचे साम्राज्य वाढलयं, नगरसेवक पालिकेत कचरा नेऊन टाकत आहेत. येणार्या निवडणूकीत परिस्थिती नक्कीच बदलणार आहे.

शशिकांत शिंदे म्हणाले, राज्याच्या कानाकोपर्यातून हल्लाबोल सभेला सुरूवात झाली. विकास काय असतो हे पिंपरी चिंचवडला बघितल्यावर होतं. अजितदादांच्या स्वप्नपूर्तीतून घडले होते. परंतू गेल्या तीन वर्षापासून पिंपरीचा विकास शोधतोय. राज्याच्या सुरक्षिततेचे तीन तेरा वाजलेत. सत्तेच्या मस्तीत आहेत, म्हणून पवार साहेबांवर टिका करू नका. कामगारांचे अस्तित्व धोक्यात आणण्याचा प्रयत्न या सरकारची सुरू आहे. शेतकरी, व्यापार्यांच्या आत्महत्या सुरू आहे. मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर मुख्यमंत्री क्लिनचिट देतात. भ्रष्टाचारी सरकारला गाठायचा असेल तर या सरकारला सत्तेतून पायउतार करावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen − seven =