पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ साठी मा. राज्य निवडणूक आयोगाचे वेळापत्रकानुसार दि. २१ फेब्रुवारी २०१७ रोजी स. ७.३०. ते सांय. ५.३० वा. या कालावधीत मतदान होणार आहे. महानगरपालिका निवडणूकीसाठी १ ते ३२ प्रभागातील प्रभाग निहाय जागांसाठी मतदान केंद्र निश्चित करणेत आलेली आहेत. मतदान केंद्रावर वापरणेत येणाऱ्या मतदान यंत्रांची सरमिसळ (Randomization) करणेची प्रक्रिया दि. १३ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी १० वा. व मतदान यंत्रे मतदान प्रक्रियेसाठी तयार करणे (EVM Preparation) चे काम दि. १४ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ९ वा. पासुन या कालावधीत निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार व प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांचे उपस्थितीत संत ज्ञानेश्वर क्रिडा संकुल (बँडमिंटन हॉल) इंद्रायणीनगर, भोसरी पुणे २६ या ठिकाणी करणेत येणार आहे. तयार झालेली मतदान यंत्रे दि. २१ फेब्रुवारी २०१७ रोजीचे निवडणूकीसाठी मतदान केंद्रावर वापरणेत येणार आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ साठी मतदार यादीत नोंदणी असलेल्या सर्व मतदारांनी दि. २१ फेब्रुवारी २०१७ रोजी मतदानाचा हक्क बजवावा व लोकशाही बळकट करावी असे आवाहन आयुक्त तथा निवडणूक अधिकारी दिनेश वाघमारे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

6 + two =