पिंपरी, दि. १3 फेब्रुवारी २०१७ – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ साठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडील नियुक्त निहाय मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी क्र. १ ते ३ यांचेसाठी मतदान कामकाजाचे निवडणूक विषयक दुसरे प्रशिक्षण दि. ११ व १२ फेब्रुवारी २०१७ रोजी दोन

सत्रात चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, संत तुकाराम नगर पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर व भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे प्रेक्षागृह या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. दि. ११ व १२ फेब्रुवारी २०१७ रोजी घेण्यात आलेल्या निवडणूक विषयक प्रशिक्षणामध्ये नियुक्त केलेल्या एकूण सुमारे ७१४० कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले.

दुस-या प्रशिक्षणाच्या दुस-या दिवशी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे झालेल्या प्रथम सत्रातील प्रशिक्षणास निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ७ च्या रुपाली आवले, निवडणूक निरीक्षक नयना बोदांर्डे, सहाय्यक आयुक्त तथा प्रशिक्षण कक्ष प्रमुख चंद्रकांत इंदलकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानदेव झुंधारे, मास्टर ट्रेनर प्रा. नरेंद्र बंड, सतीश मेहेर, भगवान मोरे, किशोर गावडे आदी उपस्थित होते. यावेळी प्रथम सत्रात निवडणूक निर्णय अधिकारी रुपाली आवले यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या. ज्ञानदेव झुंधारे यांनी प्रशिक्षणार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. मास्टर ट्रेनर प्रा. नरेंद्र बंड यांनी मतदान प्रक्रियेविषयी तर भगवान मोरे यांनी इ. व्ही. एम. बाबत माहिती देऊन प्रात्यक्षिक दाखविले. त्यानंतर द्वितीय सत्रातील प्रशिक्षणास निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ९ च्या एम.आर. मिसकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संदेश चव्हाण, अमरदीप वाकडे, सहाय्यक आयुक्त तथा प्रशिक्षण कक्ष प्रमुख चंद्रकांत इंदलकर, मास्टर ट्रेनर सतीश मेहेर, भगवान मोरे, शिवाजी लाटे आदि उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षण कक्ष प्रमुख चंद्रकांत इंदलकर यांनी निवडणूक प्रक्रियेविषयी मार्गदर्शन व सूचना केल्या. मास्टर ट्रेनर सतीश मेहेर यांनी निवडणूक कामकाज कार्यप्रणाली स्पष्ट करून सांगितली. भगवान मोरे यांनी इ. व्ही. एम. बाबत माहिती देऊन प्रात्यक्षिक दाखविले.

दुस-या प्रशिक्षणाच्या दुस-या दिवशी संत तुकाराम नगर पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे झालेल्या प्रथम सत्रातील प्रशिक्षणास सहाय्यक आयुक्त तथा प्रशिक्षण कक्ष प्रमुख चंद्रकांत इंदलकर, निवडणूक निर्णय अधिकारी क्र. १० चे निवडणूक निर्णय अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना तांबे, संजय खाबडे, पोपट कदम, कामगार कल्याण अधिकारी अनिल जगदाळे, मास्टर ट्रेनर प्रभाकर तावरे, रामेश्वर पवार, शिवाजी लाटे, किरण अंदुरे आदि उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी निवडणूक प्रक्रियेविषयी मार्गदर्शन व सुचना केल्या तसेच प्रशिक्षणार्थ्यांचे शंका, समाधान केले. मास्टर ट्रेनर रामेश्वर पवार यांनी मतदान प्रक्रिये विषयी तर किरण अंदुरे यांनी इ. व्ही. एम. बाबत माहिती देऊन प्रात्यक्षिक दाखविले. त्यानंतर द्वितीय सत्रातील प्रशिक्षणात निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ११ चे पुरुषोत्तम जाधव, सहाय्यक आयुक्त तथा प्रशिक्षण कक्ष प्रमुख चंद्रकांत इंदलकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण घोडे, मोहिनी चव्हाण, तानाजी जगदाळे, मास्टर ट्रेनर प्रभाकर तावरे, किरण अंदुरे, शिवाजी लाटे, कामगार कल्याण अधिकारी अनिल जगदाळे आदि उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी निवडणूक व मतदार प्रक्रियेबाबत माहिती दिली. मास्टर ट्रेनर प्रभाकर तावरे यांनी निवडणूक कार्यप्रणाली बाबत तर मास्टर ट्रेनर किरण अंदुरे व शिवाजी लाटे यांनी इ. व्ही. एम. बाबत माहिती देऊन प्रात्यक्षिक दाखविले.

दुस-या प्रशिक्षणाच्या दुस-या दिवशी भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे प्रेक्षागृह येथे झालेल्या प्रशिक्षणास निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ३ चे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष देशमुख, निवडणूक निरीक्षक अशोक काकडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजया यादव, सहाय्यक आयुक्त तथा प्रशिक्षण कक्ष प्रमुख चंद्रकांत इंदलकर, मास्टर ट्रेनर अविनाश वाळुंज, अंकुश इंगवले, प्रकाश कातोरे आदी उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी संतोष देशमुख यांनी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले. यावेळी निवडणूक आयोगाच्या मतदानासंबंधीच्या ध्वनीचिञफिती दाखविण्यात आल्या. निवडणूक निरीक्षक अशोक काकडे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. व काही मौलिक सुचना सह शुभेच्या दिल्या. तसेच मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी क्र. १ यांना मतदान यंत्र हाताळण्यासाठी आणि प्रात्यक्षिक करून सराव करण्यासाठी निर्माण केलेल्या १० बूथ वर क्षेत्रीय अधिकारी यांनी समक्ष मतदान यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

13 − three =