चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे, मोठया प्रमाणात कचरा निर्माण होणा-या  ठिकाणी जागेवरच ओल्या कच-यापासुन खतनिर्मिती करणे व प्लास्टीक बंदी, जलपर्णी काढणे, प्रभातफेरी आदी कार्यक्रम घेण्यात आले.

पर्यावरण दिनाचा शुभारंभ अ क्षेत्रीय कार्यालयातील भेळ चौक, संत तुकाराम उदयान मार्गे सिटी प्राईड स्कुल आकुर्डीपर्यंत प्रभातफेरी काढुन करण्यात आला.  महापालिका अधिकारी/ कर्मचारी, पर्यावरण संवर्धन समिती, आंघोळीची गोळी, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व सदस्य  या प्रभातफेरीत सहभागी झाले. सीटी प्राईड शाळेमध्ये स्वच्छतेची प्रतिज्ञा घेण्यात आली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पर्यावरणाचे महत्व यावर मार्गदर्शन केले. अ क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षा सन्मा. अनुराधाताई गोरखे, शर्मिलाताई बाबर, अमित गावडे, क्षेत्रीय अधिकारी मंगेश चितळे, सहा. आरोग्याधिकारी एम.एम. शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक, यावेळी उपस्थित होते.

अ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आकुर्डी भाजी मंडई येथील खंडेराय भाजी मंडई येथे प्लास्टीक मुक्ती मोहिम राबविण्यात आले. यावेळी कापडी पिशव्याचे वाटप करण्यात आले. प्रभाग समिती अध्यक्षा सन्मा. अनुराधा गोरखे, शर्मीला बाबर, वैभव काळे, मिनल यादव, सुनिल कदम यावेळी उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी नागरिकांना प्लास्टीक  बंदीची अंमलबजावणी करणेबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. क्षेत्रीय अधिकारी मंगेश चितळे, सहा. आरोग्याधिकारी एम.एम. शिंदे, स्थानिक नागरिक,विक्रते यांनी मोहिमेत सहभाग घेतला.

ब क्षेत्रीय कार्यालय गणपती विसर्जन घाट,बिर्ला हॉस्पिटल रोड, चिंचवड , वार्ड क्रं १८,ब प्रभाग येथे स्वच्छता मोहीम घेण्यात आली सदर मोहिमे मधे आरोग्य निरीक्षक व आरोग्य मुकादम सह ११ कर्मचारी उपस्थित होते.सदर मोहिमअंतर्गत ५०० किलो कचरा गोळा करण्यात आला. चिंचवड भाजी मंडई, चिंचवड, वार्ड क्रं १८,ब प्रभाग येथे भाजी विक्रेते व नागरिक यांना प्लास्टिक पिशवी न वापरण्या बद्दल प्रबोधन करण्यात आले. सदर कार्यक्रम मधे आरोग्य निरीक्षक व आरोग्य मुकादम सह आरोग्य कर्मचारी,भाजी विक्रेते व नागरिकांनी भाग घेतला. क क्षेत्रीय कार्यालयामध्ये केंद्रीय विहार से.नं. ४ येथे कचरा विलगीकरण व शुन्य कचरा प्रणालीबाबत जनजागर कार्यक्रम घेण्यात आला. सहा. आरोग्याधिकारी बी.बी. कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक  आर.एम. भोसले, विजय  दवाळे यांनी सहभाग घेतला.

ड क्षेत्रिय कार्यालयाकडील आरोग्य विभागा मार्फत दिनांक प्रभाग क्र. २६ , पिंपळे निलख येथील सोनिगरा केसर सोसायटी मधील सभासद तसेच ज्येष्ठ नागरीक संघ यांचे सहकार्याने कचरा विलगीकरण, प्लॅस्टीक मुक्ती, पाणी बचत, झाडे लावा झाडे जगवा अंतर्गत ज्येष्ठ नागरीक संघ, सोसायटीचे सभासद व मनपा कर्मचारी यांची जनजागृतीपर फेरी काढणेत आली. सदर कार्यक्रमास स्थायी समिती अध्यक्षा मा. ममता गायकवाड, नगरसदस्य श्री. तुषार कामठे, सामाजिक कार्यकर्ते श्री. संकेत चोंधे व अभिजीत साळुंखे तसेच स्वच्छ भारत अभियानाच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ब्रॅंड अम्बेसिडर मा. अंजली भागवत तसेच सर्व कार्यक्रमाचे आयोजक सोनिगरा केसर सोसायटीचे अभिषेक पुरोहित, ज्येष्ठ नागरीक संघाचे  प्रकाश कुकडुलकर तसेच सहा. आरोग्याधिकारी विनोद बेंडाळे, मुख्य आरोग्य निरिक्षक अजय जाधव,  श्रीराम गायकवाड, आरोग्य निरिक्षक शशिंकात मोरे, आरोग्य  मुकादम  ओव्हाळ व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात कचरा विलगीकरण, प्लॅस्टीक मुक्ती, पाणी बचत, पर्यावरणाबाबत प्रबोधन केले. त्यानंतर सोनिगरा केसर सोसायटीचे परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेणेत आला नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

ई क्षेत्रीय कार्यालयामध्ये नागरिक व कर्मचारी यांचे करीता प्लास्टीक बंदी, ओला/सुका कचरा विलगीकरण याबाबत प्रबोधनाचा कार्यक्रम सखुबाई गवळी उदयानात आयोजित करण्यात आला. सहा. आरोग्याधिकारी पी.आर.तावरे, मुख्य आरोग्य निरीक्षक अभिजीत गुमास्ते, आरोग्य निरीक्षक सुधिर वाघमारे, शंकर घाटे यावेळी उपस्थित होते.

फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्र.१ चिखली मोरे वस्ती येथील परिसरामध्ये म.न.पा कर्मचारी यांचे मार्फंत प्लास्टीक मुक्त अभियान राबवुन जनजागृती करण्यात आली. यावेळी मा.नगरसदस्या स्वीनल म्हेत्रे  तसेच परिसरातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते. या वेळी व्यावसायीकांकडुन १० किलो प्लास्टीक जमा करण्यात आले.  प्रभाग क्र. ११ कस्तुरी मार्केट जवळील परिसरामध्ये म.न.पा कर्मचारी मार्फंत प्लास्टीक मुक्त जनजागृती करुन परिसरातील व्यावसायीक यांच्या कडुन १५ किलो प्लास्टीक जमा करण्यात आले.

प्रभाग क्र. १२ रुपीनगर मेनरोड येथील परिसरात प्लास्टीक मुक्त जनजागृती करुन व्यावसायीकांकडुन ७ किलो प्लास्टीक जमा करण्यात आले.  प्रभाग क्र. १३ स्पाईन रोड निगडी या भागातील म.न.पा. व ठेकेदार कर्मचारी यांचे मार्फंत सदर परिसरातील व्यावसायीक यांचे कडुन प्लास्टीक गोळा करुन आजु-बाजुच्या परिसरातील प्लास्टीक, कचरा उचलुन घेवुन परिसर साफसफाई करणेत आला असुन अंदाजे १५ किलो प्लास्टीक गोळा करण्यात आले. सदर मोहीम मध्य़े एकुण ४७ किलो प्लास्टीक संकलन केले व जनजागृती करुन व्यावसायीकांना व नागरिकांना प्लास्टीक न वापरणेबाबत सुचना देण्यात आल्या जेणे करुन पर्यावरण स्वच्छ राहणेस मदत होईल.

सदरची  मोहीम  क्षेत्रिय अधिकारी मनोज लोणकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा.आरोग्याधिकारी डी.जे.शिर्के यांचे नियंत्रणाखाली मुख्य आरोग्य निरीक्षक जे.जे.गायकवाड, आरोग्य निरीक्षक बी.आर.कांबळे, वैभव घोळवे. सतिश पाटील व डी.यु.गणगे आदी उपस्थित होते.

ह क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक ३२ जुनी सांगवीत दत्तमंदिर घाट येथील परिसरातील नदी पात्रातील जलपर्णी काढुन विशेष स्वच्छता मोहिम घेण्यात आली. या मोहिमेत सीआरपीएफ चे २०० जवान पोलिस उपमहानिरीक्षक बिरेंद्र कुमार टोपो,  कमांन्डेन्ट, एच एस कालस, संजीव कुमार, धिरेंद्र वर्मा, उप  कमान्डेंट सचिन गायकवाड, सहा. कमान्डेंट  शीजी वी.एस, संतोष भोसले, आर.सी मीना  यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.  महानगरपालिकेचे  ह क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी आशा राऊत, सहा. आरोग्याधिकारी ज्ञानेश्वर सासवडकर, आरोग्य निरीक्षक, रश्मी तुंडलवार, उध्दव डवरी व कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते  राजु सावळे उपस्थित होते.  यावेळी नदी पात्रातील अंदाजे ५ ट्रक जलपर्णी काढण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

17 − eight =