चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम विभागीय आयुक्तांनी जाहिर केलायं. शनिवार दि.४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. याबाबतचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी नगरसचिव विभागाला दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर पिंपरीचे महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी राजीनामे दिले आहेत. दरम्यान महापौर पदाची लॉटरी कोणाला लागणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. महापौर पद भोसरीत जाणार की, चिंचवड विधानसभेच्या वाट्याला येणार यावर तर्कवितर्क लढविले जात आहेत.

विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार ४ ऑगस्ट रोजी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. पीएमपीएमपीएलच्या अध्यक्षा नयना गुंडे पीठासन अधिकारी म्हणून या निवडणूकीचे कामकाज पाहणार आहेत. तत्पुर्वी मंगळवार दि.३१ जुलै रोजी या दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्याचवेळी महापौर आणि उपमहापौर कोण होणार हे देखील स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two + eight =