पिंपरी : पवना धरणात केवळ 37 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने मंगळवार (दि. 2) पासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, पहिल्याच दिवशी महिलावर्ग आणि नागरिकांची तारांबळ उडाली त्यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याचे चित्र आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरात दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या स्थितीला पवना धरणात केवळ 37 टक्के पाणी साठा असून गेल्या वर्षी याच दिवशी 26 टक्के पाणीसाठा होता. वाढलेली लोकसंख्या व पाणीउपसा लक्षात घेऊन, प्रत्यक्ष पाऊस होऊन धरणात पुरेसा पाणीसाठा होईपर्यंत उपलब्ध पाणीसाठा जपून वापरणे गरजेचे आहे, त्यामुळे महापौरांनी गटनेते, पक्षनेते आणि प्रशासनाची बैठक घेऊन पाणी कपातीचे धोरण स्वीकारले. यासाठी शहराचे दोन भाग करण्यात आले. त्यापैकी मंगळवारी एका विभागात पाणीपुरवठा करण्यात आला. तर दुस-या विभागात त्याच्या दुस-या विभागात पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी नियमितपणे होणाºया पाण्यात २५ टक्के कपात करण्यात येत आहे.

नियोजन कोलमडले

पाणीपुरवठा विभागाने महापालिका क्षेत्रात दिवसाआड पाण्याचे नियोजन केले आहे. याबाबतची माहिती प्रभाग स्तरांवरून नागरिकांना देणे गरजेचे होते. याबाबत दवंडी पीटविणे किंवा पत्रकाद्वारे माहिती देणे गरजेचे होते. पहिल्याच दिवशी वेळापत्रक शहरातील बहुतांश भागातील नागरिकांना न कळाल्याने तारांबळ उडाली होती. ‘‘बिले न भरणाºयांवर नळजोड तोडण्याची कारवाई पाणीपुरवठा विभाग करते, यासाठी प्रबोधन करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात, पाणी कपातीची माहिती नागरिकांना कळावी, यासाठी प्रयत्न झालेले नाहीत. पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पूर्णकल्पना द्यायला हवी होती. याबाबत नाराजी व्यक्त केली. चिंचवड, निगडी, सांगवीच्या काही भागांत नियोजित वेळेत पाणीपुरवठा झाला नाही. तसेच काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला.

पाऊस लांबल्यास कपात वाढविणार

पाऊस येण्यास उशीर झाला, तर आढावा बैठक घेऊन कपातीमध्ये वाढ करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिन्यांमधील गळती शोधण्यासाठी विभागीय कार्यालयांमध्ये भरारी पथक नेमण्यात येत आहे. तसेच पाण्याचा गैरवापर, अपव्यय करणाºया नागरिकांवर प्रसंगी नळजोड खंडित करण्याची कारवाई भरारी पथकामार्फत करण्यात येणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल, असेही महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर व धरणातील पाणीसाठा पुरेसा वाढल्यानंतर दैनंदिन एकवेळ पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ten − 1 =