चौफेर न्यूज –  इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

पुण्यासह ‘पिंपरीचिंचवड’ शहरात सुध्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तीव्र आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी शहराध्यक्ष सचिन चिखले याच्यांसह मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्ता अाडवला. कार्यकर्त्यांनी निगडी येथे रस्त्यांवर झोपून रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला. तसेच कार्यकर्त्यांनी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केला.

महाराष्ट्रात मुंबई, प्रभादेवी, बोरिवली, डोंबिवली, भांडूप,  पिंपरी-चिंचवड, पुणे या शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना इंधनदरवाढीविरोधात सुरु असलेल्या भारत बंद मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमकपणे उतरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 − 5 =