चौफेर न्यूज  –  पिंपरी-चिंचवड शहर ही औद्योगीक नगरी म्हणून ओळखली जाते, औद्योगीक नगरी बरोबरच हि क्रीडा नगरी म्हणून ओळखली जावी यासाठी महापालिकेच्या वतीने क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले जाते, असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कासारवाडी येथे उभारण्यात आलेल्या लाल बहाद्दूर शास्त्री क्रिडांगणाचे तसेच अभिनव गगन स्पोर्टस क्लब यांच्या सहकार्याने माजी महापौर रंगनाथ सदाशिव फुगे महापौर चषक राज्यस्तर  खो-खो स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्या प्रसंगी ते बोलत होते.

महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास माजी महापौर रंगनाथ फुगे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सिमा सावळे, सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार, कला, क्रिडा साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते, शहरसुधारणा समिती सभापती सागर गवळी, अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे,  क प्रभाग अध्यक्षा अश्विनी जाधव, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, रोहित काटे, नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे, स्वाती काटे, सारीका बो-हाडे, स्विकृत सदस्य माऊली थोरात,  शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, पुणे जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव सचिन गोडबोले, अर्जुण पुरस्कार विजेते श्रीरंग इनामदार, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, क्रीडा प्रशासन अधिकारी राजेश जगताप, महानगरपालिका शाळेतील विद्यार्थी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, भविष्यात या शहरातून  चांगल्या खेळाडूंची निर्मिती व्हावी म्हणून महानगरपालिका प्रयत्नशिल आहे. विविध क्रिडा स्पर्धातील राज्यस्तरीय बक्षिसांचे मानकरी पिंपरी-चिंचवड शहरातील खेळाडू ठरतील त्यासाठी खेळाडूंनी प्रयत्न करावेत. यावेळी महापौर नितीन काळजे म्हणाले, कासारवाडी येथील लाल बाहाद्दूर शास्त्री क्रिडांगणाचा शहरातील खेळाडूंना चांगला उपयोग होणार आहे. या क्रिडांगणामध्ये खेळल्या जाणा-या विविध खेळाद्वारे शहरातून चांगले खेळाडू निर्माण होण्यास मदत होणार आहे. विविध खेळांमध्ये जिल्हा राज्य, केंद्रासह देश विदेशातही नावलौकिक करणारे खेळाडू घडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे, असेही ते यावेळी म्हणाले. या स्पर्धेमध्ये ८ पुरुष गट व ८ महिला संघांनी सहभाग घेतला असून त्यामध्ये २२४ खेळाडूंचा समावेश आहे. यावेळी माजी महापौर रंगनाथ फुगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे यांनी केले तर सुत्रसंचालन जयश्री साळवी यांनी केले, आभार संजय शेंडगे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × three =