चौफेर न्यूज पिंपरी –चिंचवड महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. १६ येथील रावेत व किवळे येथे मंगळवारी महापालिकेचे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.

सदर कारवाईमध्ये आर.सी.सी.- ०२ व पत्राशेड – ०१, असे एकुण ०३ बांधकाम ६०२७.६४ चौ.फुट बांधकाम (५६०.१९चौ.मी.) व १६५ मी. अनधिकृत सिमाभित पाडण्यात आले. सदर कारवाई कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता केशवकुमार फुटाणे, कनिष्ठ अभियंता व बीट निरीक्षक यांच्या पथकाने केली. यासाठी, ०५ मनपा पोलिस कर्मचारी, ०१ जे.सी.बी. व १० मजुर व १० मनपा कर्मचारी तसेच देहुरोड पोलिस स्टेशन यांचेकडील पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

7 + 8 =