चौफेर न्यूज –  भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहूती देणा-या क्रांतिवीरांना क्रांतीदिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन  चिंचवडे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षेनेते एकनाथ पवार तसेच अतिरिक्त  आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते त्यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

चिंचवडगाव येथील हुतात्मा चापेकर बंधूच्या पुतळयास, चिंचवड स्टेशन येथील क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके तसेच दापोडी येथील शहिद भगतसिंग व हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यास पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षेनेते एकनाथ पवार तसेच अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. चिंचवडगांव येथे झालेल्या कार्यक्रमास अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, नगरसदस्य राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, शितल शिंदे, नामदेव ढाके, प्रभागाचे नामनिर्देशित सदस्य विठठल भोईर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, संदिप खोत, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे सदस्य संजय कुलकर्णी, गतीराम भोईर  आदि उपस्थित होते.

दापोडी येथील शहीद भगतसिंग व हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळयासही महापौर राहुल जाधव व उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या स्वाती काटे, आशा धायगुडे-शेंडगे, नगरसदस्य राजू बनसोडे, शितल शिंदे, नामदेव ढाके, हुतात्मा नारायण दाभाडे यांचे वंशज सरोज दाभाडे, विजय दाभाडे, धनंजय दाभाडे, प्रभाग समितीचे नामनिर्देशित सदस्य संजय कणसे, माजी नगरसदस्या चंद्रकांता सोनकांबळे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी ज्ञानेश्वर सासवडकर, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 + nine =