चौफेर न्यूज   पिंपरी चिंचवड शहरातील अंध, अपंग, मुकबधीर विद्यार्थी व नागरीकांना पी.एम.पी.एम.एलची मोफत बस पास सेवा महापालिकेमार्फत देण्यात येत असून सुमारे २६३० पासधारकांसाठी येणा-या सुमारे ३ कोटी ८८ लाख ८६ हजार रुपयांच्या खर्चासह शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे २१७ कोटी ९१ लाख ८७ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

तसेच पिंपरी चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करणे व मोशी कचरा डेपो पर्यंत वाहतुक करण्याच्या कामास व त्यासाठी येणा-या खर्चासही या सभेत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. ग प्रभागात ठिकठिकाणी आवश्यकतेनुसार डांबरीकरण करण्यासाठी येणा-या सुमारे ४ कोटी ८ लाख ७६ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र २९ से.क्र. ४,६,९,११ परिसरातील ठिकठिकाणचे रस्ते बी.बी.एम. व खडीमुरुमाचे रस्ते विकसित करण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी २३ लाख ३९ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र ४५ पिंपरी वाघेरे येथील आरक्षण क्र. १७३ येथे सिमाभिंत बांधण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी ४९ लाख ९२ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. फुगेवाडीमधील लोकमान्य टिळक शाळेच्या जुन्य इमारतीत फेरफार करुन नविन शाळा इमारत बांधणे व स्थापत्य विषय कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ४ कोटी ०२ लाख ७२ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र २५ वाकड आरक्षण क्र. ४/११ जकात नाक्याचे जागेसाठी सिमाभिंत घालण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी ६१ लाख ७६ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सांगवी, किवळे रस्त्यावर बी.आर.टी.एस बस स्टेशन जवळील बस डॉंकिंगच्या जागेचे मजबुतीकरण करण्यासाठी येणा-या सुमारे ३ कोटी ६८ लाख ३० हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पुणे नाशिक महामार्गावरील पांजरपोळ चौक ते पुणे आळंदी रस्त्यापर्यंतचा विकास आराखड्यातील रस्ता विकसित करण्यासाठी येणा-या सुमारे ५० कोटी ९४ लाख ९८ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र ६ डुडुळगाव येथील स.क्र.१३४ ते १८६ विकास आराखड्यातील १८ मिटर रस्ता विकसित करण्यासाठी येणा-या सुमारे २३ कोटी ९३ लाख ६३ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. २० चिंचवडेनगर मध्ये बिजलीनगर अंरडपास करण्यासाठी येणा-या सुमारे १३ कोटी २१ लाख ८४ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. चिखली से. क्र. १७ व १९ येथे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या गृहप्रकल्पामध्ये विविध आरक्षणे विकसित करण्यासाठी येणा-या सुमारे ९ कोटी ८५ लाख ५१ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. देहू कमान ते झेंडेमळा रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यासाठी येणा-या सुमारे १२ कोटी ५५ लाख ९६ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. ७ च-होली येथील स.नं. ४५८ ते ४०४ (पठारे मळा) येथील १८ मिटर विकास आराखड्यातील रस्ता विकसित करण्यासाठी येणा-या सुमारे ९ कोटी ७३ लाख ९८ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सांगवी किवळे रस्त्यावर पार्क स्ट्रिट समोर सबवे बांधण्यासाठी येणा-या सुमारे ८ कोटी ५९ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fourteen − 1 =