चौफेर न्यूज पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये ६९ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला माधवराव पंडिराव शेवाळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. परेड संचलनाने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजस्तंभाचे पूजन करून ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर राष्ट्रगीत व ध्वजगीत म्हणून ध्वजाला सलामी देण्यात आली.

या कार्यक्रमासाठी तिरंगी रंगात सुबक अशी रांगोळी तसेच सुंदर से फलक लेखन करण्यात आले होते. पाहुण्यांचा परिचय करून सत्कार करण्यात आला. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी अनुष्का अहिराव, यश बागुल, जीत शिंदे, कुशाल पवार, काव्या कोठावदे, वैष्णवी भामरे, अर्चिता खैरनार, मोहित बेंद्रे, अवनी खैरनार, दिशांत भदाणे, प्रणव सोनवणे, सिद्धेश बिरारीस, लक्ष्मीकांत साबळे, तेजस निकम, लेकराज बिरारीस, प्रणव भदाणे, चैतन्य दाभाडे या विद्यार्थ्यांनी भाषण देवून सहभाग नोंदविला.

कृतिका मानकर – झाशीची राणी, प्रत्यशा कोठावदे – भारतमाता, सर्वेश सोनवणे –पंडित जवाहरलाल नेहरु या विद्यार्थ्यांनी महापुरुषांची वेशभूषा परिधान करून कार्यक्रमात रंगत आणली. शिक्षीका अर्चना देसले, अनिता पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्राचार्य वैशाली लाडे यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक व लोकशाही या विषयी मार्गदर्शन केले. समन्वयक राहुल अहिरे यांनी  प्रजासत्ताक दिनाची माहिती दिली. एलकेजीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करून देशभक्तीची भावना निर्माण केली. अरनीश दशपुते, प्रेमराज गवळी, सर्वेश सोनवणे, चारुदत्त अहिरे, गौरव कोकणी, आदित्य अकलाडे, जयदिप अकलो यांनी नृत्यात सहभाग घेतला. प्रसंगी संविधानाचे वाचन झाले. त्यानंतर we shall over come हे गीत जल्लोषात कृतीतून सादर करून कार्यक्रमाची सांगता झाली. सुत्रसंचालन पूनम तवर तर पूनम बिरारीस यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × 4 =