साक्री : पिंपळनेर येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलतर्फे फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांना वर्गनिहाय विषय देऊन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध फळे, पोस्टमन, डॉक्टर, नर्स, दूधवाला, पोलिस यांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी केली होती. स्वातंत्र्य सेनानी, शैक्षणिक साहित्य या विषयाला अनुसरूनही काही विद्यार्थ्यांनी वेशभूषा  केल्या हेात्या.

प्राचार्य मोहन गावित अध्यक्षस्थानी होते. अनिता पाटील, प्रांजली जोशी आदी या वेळी उपस्थित होत्या. शाळेचे व्यवस्थापक राहुल अहिरे यांनी स्पर्धेचे गुणलेखन केले. कृषाली भदाने यांनी सूत्रसंचालन केले. पूनम तवर यांनी रांगोळी रेखाटन केले. अर्चना देसले यांनी आभार मानले. जयेश घरटे आणि संगीता कोठावदे यांनी सहकार्य केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seven − six =