पिंपरळनेर – मामाचा गाव अन् खेळ्यात दंग असलेल्या मुलांची सुट्टी संपली अन् नव्या एज्युकेशन इनिंगची सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी या नवीन विद्यार्थ्यांचा गुलाबाची फुले हातात देऊन स्वागत सोहळा पिंपळनेर येथील प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये पार पडला.

स्वागत सोहळा पाहून सर्व चिमुरड्यांना मोठा आनंद झाला. रडणारी मुले हसायला लागली. टप्या टप्याने सर्व लहान विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा घेण्यात आला. आपल्या शाळेत नव्याने प्रवेश घेतलेली चिमुकले व त्यांच्या पालकांचा चौथीच्या विद्यार्थिनींनी वेलकम आणि ऑल ऑफ यू या नृत्याद्वारे स्वागत केले.

शनिवार दि. 6 जुलै 2019 रोजी नवीन पालक व नवीन विद्यार्थ्यांचा ‘स्वागत सोहळा’ स्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रचिती पब्लिक स्कूलचे चेअरमन श्री. प्रशांत पाटील अध्यक्षस्थानी होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. तसेच, आयुष्याची एका नवीन इनिंगची सुरुवात करीत असलेल्या चिमुकल्यांना शुभेच्छा दिल्या. यासह, आपल्या पाल्याच्या शिक्षणात आणि संस्कारात कुठलीही कमी पडू देणार नसल्याचा विश्वास पालकांसमोर व्यक्त करीत स्कूलमध्ये वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी, प्राचार्या वैशाली लाडे, व्यवस्थापक राहुल अहिरे, प्रमुख पाहुणे राजू पाटील, शिला शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमा पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी, चौथीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. तसेच प्रमुख अतिथींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अनिता पाटील यांनी शिक्षण प्रक्रियेतील महत्व पालकांना पटवून दिले. प्राचार्या वैशाली लाडे यांनी वर्षभरात विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी शाळेत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अश्विनी मॅडम यांनी केले तर आभार अर्चना देसले यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × four =