चौफेर न्यूज –  पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये गुरुवारी “यलो डे” उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य वैशाली लाडे तर समन्वयक राहुल अहिरे प्रमुख म्हणून होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आश्विनी पगार यांनी केले. त्यांनी पिवळ्या रंगाचे महत्व सांगून गीत सादर केले.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. पुनम बिरारीस यांनी मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, पिवळा रंग हा स्वाभिमान आणि मित्रत्वाचे प्रतिक असल्याचे सांगत पिवळ्या रंगातील वस्तूंचे महत्व विषद केले. तसेच, प्राचार्या लाडे यांनी पिवळ्या रंगाचे महत्व सांगीतले. प्रसंगी, विद्यार्थ्यांनी पिवळा रंगाचे ड्रेस परिधार करून कार्यक्रमात रंगत आणली. सुंदर फुलांच्या माध्यमातून फलक लेखन निलिमा देसले यांनी केले. तसेच, सुबक अशी रांगोळी रेखाटली. आभार प्रदर्शन पूनम तवर यांनी केले. कार्यक्रमाची सजावट अनिता पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी कृषाली भदाणे, अर्चना देसले, पूनम बिरारीस, अश्विनी पगारे, पूनम तवर, अनिता पाटील, निलिमा देसले, शिक्षकेतर कर्मचारी जयेश घरटे, संगीता कोठावदे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 + nine =