चौफेर न्यूज –  पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये “प्रचिरंग” वार्षीक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. भारतीय संस्कृती व भारतीय संस्कृतीतील गीते या विषयावरील नृत्य महोत्सवाने रंगत आणली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कविता पाटील यांनी भूषविले. यावेळी, शाळेचे चेअरमन प्रशांत भिमराव पाटील, कविता भिमराव पाटील, संजय भिमराव पाटील, मीना संजय पाटील, भारती राहुल अहिरे, प्राचार्य अतुल देव, प्राचार्य भारती पंजाबी, समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे, विद्यार्थी पालक मिताली पाटील, अमृता साबळे, कविता पाटील, देवयानी सोनवणे, सुचिता खैरनार, पुनम भदाणे, सुरेखा शेवाळे, कल्पना भदाणे, निर्मला भामरे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व सरस्वती प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर पाहुण्यांचा परिचय करून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमातील पहिल्या भागात आपल्या जीवनात आपले बालपण मित्र परिवार, या संबंधीत गीतांचे सादरीकरण झाले. तसेच, आपल्या जिवनात आई वडीलांचे महत्व किती, म्हातारपणी त्यांच्याशी कसे वागावे… हे प्रेक्षकांना नाट्यकरणातून दाखविण्यात आले. दुसऱ्या भागाला शिवाजी महाराजांच्या पोवाड्याने सुरुवात झाली. भारतीय संस्कृतीतील विविध नृत्यप्रकार यामध्ये कथ्थक, राजस्थानी, लावणी, जोगवा, पंजाबी अशा विविध नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात विशेष म्हणजे पालकांनी सुद्धा रंगमंचावर आपल्या पाल्यांसोबत नृत्य सादर करून विद्यार्थ्यांना नृत्यांसाठी प्रोत्साहित केले. दरम्यान चेअरमन प्रशांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य वैशाली लाडे यांनी वार्षिक अहवाल पालकांसमोर सादर केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्मिता नेरकर यांनी केले. तर, कार्यक्रमाचा कार्यभार निलीमा देसले यांनी सांभाळला. या कार्यक्रमासाठी चेअरमन प्रशांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य वैशाली लाडे, समन्वयक राहुल अहिरे, शिक्षीका कृषाली भदाणे, अनिता पाटील, अर्चना देसले, निलीमा देसले, अश्विनी पगार, पुनम बिरारीस, पुनम तवर, शिक्षकेतर कर्मचारी माहेश्वरी अहिरे, जयेश धरटे, संगिता कोठावदे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले. भोजनाच्या आस्वादानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला. अनिता पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seven + twenty =