चौफेर न्यूज – विद्या आणि बुध्दीची देवता लाडक्या गणरायाचे पिंपळनेर प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये हर्षोल्हासात गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात मंगलमय वातावरणात बाप्पाचे आगमन झाले. बाप्पाच्या आगमनामुळे भक्तांच्या चेहर्‍यावर अपूर्व उत्साह दिसून आला. वाजत-गाजत गणरायाला विराजमान करुन, पवित्र मंत्रोच्चारात सुशील भदाणे व निलिमा भदाणे यांच्या हस्ते विधीवत पूजा-अर्चा केल्यानंतर गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

सकाळपासून गणपती बाप्पाला नेण्यासाठी शिक्षक तसेच विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली. स्कूलच्या प्राचार्या वैशाली लाडे, व्यवस्थापक राहुल पाटील, अनिता पाटील, अर्चना देसले, कृषाली भदाणे, निलीमा देसले, आश्विनी पगार, पुनम बिरारीस, ज्योत्स्ना भदाणे, वर्षा भामरे यांच्यासह माहेश्वरी मॅडम, संगीता कोठावदे, खैरनार, जयेश घरटे आदी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × 4 =