पिंपळनेर – येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर अशा गजरात सात दिवसाच्या बाप्पाचे बुधवारी विसर्जन करण्यात आले. विसर्जनासाठी नदीवर विद्यार्थी व शिक्षकांनी गर्दी केली होती.

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर… या अशा घोषणा देत गणपती बाप्पा उंदरावर बसून परतीच्या मार्गावर निघाले. तत्पूर्वी, विद्यार्थ्यांच्या हस्ते गणपती उत्साहा निमित्ताने गणपती स्तोत्र, गीतगायन, आरती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. गणरायाचे सुंदर असे चित्र रेखाटन, स्पर्धेच्या शुभेच्छा फलक लेखनातून देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता पाटील यांनी केले. सरस्वती प्रतिमा पूजनाने स्पर्धेची सुरुवात झाली.

विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी घेत गणरायाविषयी असलेले प्रेम गीत,  स्तोत्र, आरती यातून व्यक्त केले.  गणरायाच्या विसर्जनासाठी सत्यनारायणाची पूजन श्रीकांत पाटील, अनिता पाटील यांनी केले. महाप्रसादानंतर वाजत गाजत मिरवणुक काढून गणपती बाप्पा तलावावर विसर्जनासाठी निघाला. यावेळी, स्कूलच्या प्राचार्या वैशाली लाडे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. बाप्पाचा मुक्काम चैतन्य निर्माण करणारा ठरतो. त्याचे आगमनच जीवनातील सगळी दु:ख दूर करतो, अशी भावना विसर्जन करण्यासाठी आलेल्या शिक्षकांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 − 13 =