पिंपळनेर – येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये पिंक कलर डे चे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पिंक डे महत्व सांगून कार्यक्रम साजरा झाला. सर्वांना स्वतःकडे आकर्षित करणे,  मनामध्ये कोमल भावनांचा संचार तसेच प्रेम,  आनंद, शीतलता याचे प्रतिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलाबी रंगाचे महत्त्व यावेळी पटवून देण्यात आले. कार्यक्रमास अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, शाळेचे व्यवस्थापक राहुल अहिरे उपस्थित होते.

सरस्वती पूजनाने कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. गुलाबी रंग विषयक माहिती सांगताना विद्यार्थिनी मनस्वी भदाणे,  ज्योत्स्ना भदाणे मॅडम यांनी सादर केली.  गुलाबी रंगाचे महत्त्व प्राचार्य वैशाली लाडे यांनी सांगितले. गुलाबी रंगाच्या पोशाखात उपस्थित विद्यार्थी पिंक कलर डेचे आकर्षण ठरले. तसेच शाळेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. दरम्यान, पिंक कलर डे  निमित्ताने सुंदर रांगोळी काढण्यात आली. तसेच, गुलाबी रंगाच्या वस्तूचे फलक लेखन देखील करण्यात आले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम बिरारिस यांनी केले.  निलिमा देसले यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ten + 19 =