पिंपळनेर – आई एकविरा फाऊंडेशन संचलित प्रचिती प्री प्रायमरी स्कूल, पिंपळनेर येथे मंगळवार दि. १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे अराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सरस्वती प्रतिमा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्या वैशाली लाडे होत्या. स्कूलचे समन्वयक राहुल अहिरेयावेळी उपस्थित होते. दरम्यान, तेजस खैरनार, मनन बिरारीस, जितेश ठाकरे या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांची वेशभुषा साकारून त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्याचप्रमाणे, छत्रपती आमचे दैवत या गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.

प्रसंगी, उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या जिवनकार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. निलिमा देसले, प्राचार्या वैशाली, समन्वयक राहुल अहिरे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर, विद्यार्थ्यांची भाषणे देखील झाली. कार्यक्रमावेळी, छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिकात्मक चित्र असलेली रांगोळी आकर्षणाचा भाग ठरली. विद्यार्थ्यांनाफलकलेखनातून शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना देसले यांनी केले. कृषाली भदाणे यांच्याआभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता  झाली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × 2 =