चौफेर न्यूज शालेय जिवनापासून विद्यार्थ्यांना व्यवहाराचे ज्ञान मिळावे तसेच शैक्षणिक जिवनातून जत्रेचा आनंद घेता यावा, यासाठी पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये (fun fair) आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. २५ नोव्हेंबर रोजी शाळेच्या आवारात हा उपक्रम राबविण्यात येत असून स्कूल प्रशासनाकडून मेळाव्याची जय्यत तयारी सुरु आहे.

या मेळाव्यामध्ये माता – पालकांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने खाद्यपदार्थाची थाळी  सजावट स्पर्धा देखील घेण्यात येणार आहे. या मेळाव्यास विद्यार्थ्यांनी नेहमीच्या वेळेवर रंगीत पोशाखात सकाळी १० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन स्कूलच्या प्राचार्या यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 + twelve =