पिंपळनेर – पिंपळनेर प्रचिती प्री प्रायमरी स्कूल येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. शिक्षकदिनानिमीत्त शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका साकारल्या.

प्रसंगी, विद्यार्थ्यांना शिक्षकदिनाचे महत्व सांगून प्राचार्या वैशाली लाडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी, अनिता पाटील, अर्चना देसले यांच्यासह वर्गशिक्षीका उपस्थित होत्या. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

त्याअनुषंगाने, विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकरली. यावेळी प्राचार्यांची भूमिका श्रावणी शेवाळे हिने निभावली.  तर समन्वयक म्हणून तेजस खैरनार याने काम पाहिले. तसेच, शिक्षकांच्या भूमिका साकारणाऱ्या विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे वर्ग घेतले. प्रसंगी, शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देणारे चित्र रेखाटण्यात आले होते. निलिमा देसले यांनी शिक्षक दिनानिमित्ताने “वुई लव्ह यु टीचर” हे गीत सादर केले. तसेच, सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तेजस बिरारीस, प्रणव भदाणे यांनी केले.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × 1 =