चौफेर न्यूज – पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये गुरुवार दि. २८ रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. दरम्यान, झालेल्या विविध क्रीडा स्पर्धांनी महोत्सव चांगला रंगला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश पवार होते. परेड संचालनाने अतिथींचे स्वागत होवून विद्यार्थ्यांनी ऑलंम्पिक ध्वज फडकाविला. यावेळी, प्राचार्य वैशाली लाडे, समन्वयक राहुल अहिरे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय राहुल अहिरे यांनी करून दिला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली.

दरम्यान, क्रीडा महोत्सवाचे वर्णन करणारे सुंदर असे फलक लेखन करण्यात आले. तसेच, क्रीडा दिवसाचे औचित्य साधून खेळाशी अनुरुप ऑलम्पिक ध्वज, प्रज्वलित मशाल व क्रीडा साहित्य यांची सुरेख प्रतिकृतीची रांगोळी रेखाटण्यात आली. प्राचार्य वैशाली लाडे यांनी खेळाचे महत्व विषद केले. त्यानंतर, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मशाल प्रज्वलीत करून कु. लेकराज बिरारीस याने संपूर्ण क्रीडांगणाला फेरी मारली. दरम्यान, सर्व विद्यार्थ्यांनी लेझीम, डमबेल व कवायतीचे विविध प्रकार अतिशय सुंदर प्रकारे करण्यात आले. प्रमुख अतिथींच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करून विविध खेळांना सुरुवात झाली.

नर्सरीच्या विद्यार्थ्यांसाठी फ्लॉग जम्प, बॉल बॅलंसिंग, बलुन ब्रस्ट, रनिंग हे नाविन्यपूर्ण खेळ घेण्यात आले. तसेच, एलकेजी च्या वर्गासाठी लेमन अँड स्पून, बिस्कुट बायटींग, फनी बनी, करेट रेस, रनिंग, युकेजीच्या वर्गासाठी बुक बॅलंसिंग पोटॅटो रेस, लोम्बा टीपू गेलास प्लॉस्टीक, रनिंग, पहिलीच्या वर्गासाठी थ्री लेग्स, थ्रो बॉल ॲड डाऊन बटल, स्कीप रोप, रनिंग हे खेळ, तसेच, दुसरीच्या वर्गासाठी बलुन रेस, ब्लो द बॉल, लाँग जंम्प, रनिंग हे खेळ आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषाली भदाणे यांनी केले. प्राचार्य वैशाली लाडे, समन्वयक राहुल अहिरे, शिक्षीका अनिता पाटील, अर्चना देसले, निलीमा देसले, आश्विनी पगार, पुनम बिरारीस, पुनम तवर यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी माहेश्वरी अहिरे, संगिता कोठावदे, जयेश घरटे यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 − eleven =