पिंपळनेर – येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये शाळेअंतर्गत रेड कलर डे आणि कविता गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या वैशाली लाडे होत्या. व्यवस्थापक राहुल पाटील यावेळी उपस्थित होते.

सरस्वती प्रतिमापूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. अनिता पाटील यांनी लाल रंगाचे महत्व विषद केले. अर्चना मॅडम यांनी रेड रेड ॲपल ही कविता विद्यार्थ्यांकडून सादर करून घेतली. इयत्ता २ रीची विद्यार्थीनी प्राची शिंदे, इ.३ री चा विद्यार्थी चैतन्य दाभाडे यांनी रेड डे बद्दलची माहिती दिली.

युकेजीच्या शिक्षीका अनिता पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून रेड डे निमित्ताने फुलपाखराचे चित्र काढून त्यात लाल रंग भरण्याचा उपक्रम राबविला. पहिलीच्या शिक्षीका अर्चना देसले यांनी लाल रंगाचे मुखवटे विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतले. इ. २ रीच्या शिक्षीका आश्विनी पगार यांनी स्ट्रॉबेरी चित्र काढले. तसेच, इ. ३ रीच्या शिक्षीका पूनम बिरारीस यांनी रांगोळीच्या माध्यमातून लाल रंगाच्या वस्तू / चित्र बनवून घेतले. एलकेजीच्या शिक्षीका कृषाली भदाणे यांनी सफरचंदाचे चित्र काढले. नर्सरीच्या शिक्षीका निलीमा मॅडम यांनी टोमॅटो चित्रात रंग भरण्याची स्पर्धा घेतली. दरम्यान, प्राचार्या वैशाली लाडे यांनी लाल रंगाचे महत्व विषद केले. लाल रंग हा प्राथमिक रंगाचा आहे. प्रेमाचा व सौभाग्याचा, क्रोध दर्शविणारा रंग म्हणून त्याची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, रेड डे निमीत्ताने कविता स्पर्धा पार पडली. यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रेड डे च्या शुभेच्छा देणारे चित्र रेखाटण रांगोळीच्या माध्यमातून काढण्यात आले. लाल रंगाच्या विविध वस्तूंची माहिती देणारे चित्र फलकलेखनातून काढण्यात आले. कार्यक्रमासाठी प्राचार्य वैशाली लाडे, व्यवस्थापक राहुल पाटील, अनिता पाटील, अर्चना देसले, कृषाली भदाणे, निलीमा देसले, आश्विनी पगार, पुनम बिरारीस, ज्योत्स्ना भदाणे, वर्षा भामरे यांच्यासह माहेश्वरी मॅडम, संगीता कोठावदे, खैरनार, जयेश घरटे आदी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषाली भदाणे यांनी केले. आभार आश्विनी पगार यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 + fifteen =