पिंपळनेर – मानवी जीवनात निळ्या रंगाला खूप महत्व आहे. विद्यार्थ्यांना या रंगाची ओळख आणि माहिती होण्यासाठी येथील पिंपळनेर प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये ब्लु डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ब्लु डे निमीत्ताने विद्यार्थ्यांनी निळा रंगाचा वेश परिधान केल्याने कार्यक्रमात शाळेचा परिसर निळ्या रंगाने भरून निघाला. तत्पूर्वी, कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजनाने झाले.

प्रसंगी, शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे यांनी निळ्या रंगाने महत्व विषद केले. यावेळी, शाळेतील शिक्षीकांनी निळ्या रंगातून सुंदर असे निसर्ग चित्र रेखाटले. यामध्ये समुद्र, डॉल्फिन काढून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात निळ्या रंगाचे महत्त्व, माहिती शिक्षिका पूजा नेरकर यांनी सांगितली. यावेळी शिक्षिका अर्चना देसले यांच्यासह विद्यार्थ्यांनी निळ्या रंगाविषयीची माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली. कार्यक्रमाचे आभार शिक्षिका पूनम बिरारीस यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 − two =