महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमीत्त विविध उपक्रमाचे आयोजन

पिंपळनेर – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्तेनुसार घेण्यात आलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रसंगी, कार्यक्रमाच्या अध्यक्षा हेमांगी भामरे यांनी महापुरुषांच्या कार्यांची विद्यार्थ्यांना माहिती दिली.

नर्सरी – फुल, फळ, भाज्या. युकेजी – स्वच्छता ठेवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू चांगल्या सवयी / कीटक. युकेजी – शैक्षणिक साहित्य. पहिली – पर्यावरण, आरोग्य, खाद्य पदार्थ. दुसरा वर्ग – तांत्रिक / विद्युत. तीसरा वर्ग – मुली वाचवा, पाणी वाचवा, या विषयांवर स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी संबंधित विषयांची प्रतिकृती तयार करून स्पर्धेत सादरीकरण केले.

याप्रसंगी, गांधीजीचे प्रतित्मातक चित्र रेखाटन करून फॅन्सी ड्रेस स्पर्धेतसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाची प्रस्तावना नीलिमा देसले यांनी केली. दरम्यान, प्रिन्स कुवर या विद्यार्थ्यांने महात्मा गांधी यांची भूमिका साकारली. यावेळी, प्राचार्य वैशाली लाडे, शिक्षिका पूजा नेरकर यांनी महात्मा गांधी, लालबहादुर शास्री यांच्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. ज्योत्स्ना भदाणे यांच्या आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × four =