पिंपळनेर – दसऱ्याच्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचे दहन करुन सीतेची सुटका केली. याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी सिमोल्लंघन करून रावण दहन करण्यात येते. बुधवार दि. १७ रोजी पिंपळनेर येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी, शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, समन्वयक राहुल पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षक उपस्थित होते. सरस्वती प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी जीत शिंदे, यश बागुल, कृतिका मानकर या विद्यार्थ्यांनी श्रीराम, लक्ष्मण आणि सितेची भुमिका साकारली.

तसेच, दुर्गा मातेने महिषासुराचा वध कसा केला, हे नाट्यकरणातून दाखविण्यात आले. अर्चना देसले यांनी दसरा सणाची माहिती दिली. तर, अनिता पाटील यांनी महिषासुराचा वध ही कथा सांगितली. विद्यार्थांनी गरबा, दांडिया खेळून या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषाली भदाणे यांनी केले. ज्योत्स्ना भदाणे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one + three =