चौफेर न्यूज – पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये शुक्रवारी युवक दिन व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात  सरस्वती प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी, प्राचार्य वैशाली लाडे, समन्वयक राहुल अहिरे उपस्थित होते. दरम्यान, युवा दिनाचे महत्व पटवून देणारी आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली. प्राचार्य लाडे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जिवनावर माहिती सांगितली. तसेच, राजमाता जिजाऊ यांचे जिवन कार्य स्पष्ट केले. समन्वयक राहुल पाटील यांनी स्वामी विवेकानंदाचे व्यक्तीमत्व, बालपण तसेच साधी राहणीमान उच्च विचारसरणी याविषयी मुलांना माहिती दिली. तसेच, जिजाऊंच्या संस्कारांचे उदाहरण देत त्यांना मानाचा मुजरा दिला.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषाली भदाणे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्राचार्य वैशाली लाडे, समन्वयक राहुल पाटील, शिक्षीका कृषाली भदाणे, अनिता पाटील, अर्चना देसले, निलीमा देसले, अश्विनी पगार, पुनम बिरारीस, पुनम तवर यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी माहेश्वरी आहिरे, संगिता कोठावदे, जयेश घरटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता अनिता पाटील यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 − 10 =