चौफेर न्यूज – पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये विविध कार्यक्रमांनी देशाचा ७० वा स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा करण्यात आला. भिकाजी भदाणे यांच्याहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. यावेळी, राहुल ओहल, प्राचार्य वैशाली लाडे, शाळेचे समन्वयक राहुल अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली.

विद्यार्थी लिडर्स लेखराज बिरारीस, लक्ष्मीकांत साबळे, प्रेमराज गवळी, मनन बिरारीस यांच्यासह विद्यार्थ्यांनी परेड संचलन केले. दरम्यान, “ध्वजगीत विजयी विश्व तिरंगा प्यारा” आणि “वुई शॉल ओव्हरकम” हे उत्साहस्फुर्ती गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. सदर कार्यक्रमासाठी पुनम बिरारीस यांनी भारत मातेच्या सुबक अशा रांगोळीचे रेखाटन केले. स्वातंत्र्य दिनानिमीत्त महापुरुषांची आठवण व्हावी, म्हणून युकेजी विद्यार्थी प्रत्युशा कोठावदे- झाशी की राणी, खुशाल पवार- महात्मा गांधी, मनन बिरारीस – सुभाषचंद्र बोस, आयुष देसले- पंडीत जवाहरलाल नेहरू, लावण्या सुर्वे- सावित्रीबाई फुले. इयत्ता १ लीचे विद्यार्थी अवनी कापडणीस – झाशी की राणी, हर्षदा शेवाळे – इंदिरा गांधी यांची वेशभूषा साकारली.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या केशरी, पांढरा, हिरवा या रंगाच्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले. भिकाजी भदाणे यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. अर्चना देसले, आश्विनी पगार यांच्या उत्कृष्ट फलक लेखनाने कार्यक्रमात भर घातली. प्रसंगी, मान्यवरांचा सत्कार वैशाली लाडे, राहुल अहिरे यांनी केला. युकेजी वर्गातील विद्यार्थी वैष्णवी भामरे, परिन कोतकर, वैष्णवी भामरे, मोहित बेंद्रे, पहिली वर्गातील विद्यार्थी सिद्धेश बिरारीस, प्रणव भदाणे, श्रावणी शेवाळे तर दुसरीतील विद्यार्थी लेखराज बिरारीस यांनी भाषणे केली. “भारत माता की जय, जय जवान जय किसान”, “वंदे मातरम्‌” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. “सुनो गौर से दुनिया वालो” या देशभक्तीपर गीतावर मनस्वी भदाणे, मृणाली अहिरराव, लावण्या मुसळे, कोमल शेवाळे, अक्षदा कापडणीस, क्रांती मनोरे, मानसी आहिरे, श्रावणी शेवाळे आदी विद्यार्थीनींनी सुंदर नृत्य सादर केले. शाळेच्या शिक्षीका निलीमा देसले यांनी शहिद गीत म्हटले. प्राचार्या वैशाली लाडे यांनी “जहॉ डाल डाल पे सोने की चिडीयॉ,” या गितातून स्वातंत्र्य दिनाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अर्चना देसले यांनी केले. आभार अनीता पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ten − ten =