चौफेर न्यूज – प्रचिती प्री- प्रायमरी स्कूल पिंपळनेर येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य वैशाली लाडे होत्या. समन्वयक राहुल अहिरे, आनंद मेळाव्यातील थाळी सजावट स्पर्धेचे विजेते निलेश मानकर, दिपाली कुवर, स्नेहल खैरनार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून सत्कार करण्यात आला. निलेश मानकर यांनी आपल्या जिवनातील प्रसंग सांगून मुलांना प्रोत्साहीत केले. तसेच, स्नेहल खैरनार यांनी आपल्या यशामागे पालकांइतकाच शिक्षकांचा सहभाग असतो हे मुलांना पटवून दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषाली भदाणे यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथी निलेश मानकर, दिपाली कुवर, स्नेहल खैरनार यांच्या हस्ते पारितोषीक देवून सन्मान करण्यात आला. तसेच तृतीय विजेत्या दिपाली कुवर यांचा गौरव प्राचार्या वैशाली लाडे यांनी सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देवून गौरव केला. उत्तेजनार्थ बक्षिसाने स्नेहल खैरनार यांना सन्मानित करण्यात आले. आश्विनी पगार यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी प्राचार्य वैशाली लाडे, समन्वयक राहुल अहिरे, शिक्षीका कृषाली भदाणे, अनिता पाटील, अर्चना देसले, निलीमा देसले, अश्विनी पगार, पूनम बिरारीस, पूनम तवर तसेच शिक्षकेतर कर्मचारी माहेश्वरी अहिरे, संगिता कोठावदे, जयेश घरटे आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 + 4 =