चौफेर न्यूज –  शहरात सध्या “रिंग रोड’वरून गदारोळ सुरु आहे, मात्र पिंपळेगुरव येथे ”रिंग रोड’च्या नावाखाली उद्यान आणि जॉगिंग पार्क उभारले जाणार आहे. “रिंग रोड’मुळे गुरुद्वार परिसर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, पिंपळे गुरव, कासारवाडी परिसरात तीन हजार पेक्षा जास्त घरे बाधित आहेत. अन्‌ दुसरीकडे मात्र 11 कोटी रूपये खर्च करून नियमबाह्य उद्यान उभारण्याचे काम सुरू असल्याचा आरोप घर बचाव संघर्ष समितीने केला आहे.

घर बचाव संघर्ष समितीचे समन्वयक विजय पाटील, राजेंद्र देवकर, शिवाजी इबितदार, मोतीलाल पाटील, अमर आदियाल, तानाजी जवळकर, निलचंद्र निकम, राजेंद्र पावर आदींनी प्रस्तावित ै”रिंग रोड’ची पाहणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. पिंपळे गुरव येथील गोविंद गार्डन परिसरात महापालिका जॉगिंग पार्क व गार्डनची निर्मिती करत आहे. हे काम बेकायदेशीरपणे नियम धाब्यावर बसवून चाललेले आहे.

एकीकडे “रिंग रोड’च्या जागेवर अतिक्रमण करायचे आणि दुसरीकडे अतिक्रमणावर स्वत:चीच पोळी भाजून घेण्याचा महापालिकेचा प्रकार सुरू आहे, असा दुटप्पी खेळ सध्या महापालिका खेळत असल्याचे दिसून येत आहे. प्रस्तावित “रिंग रोड’च्या जागेवर कोणत्या नियमाच्या आधारावर गार्डनचे काम सुरु आहे, असा प्रश्न पिंपळे गुरवमधील नागरीक करीत आहेत, याचा खुलासा महापालिकेने करावा अशी मागणी घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × 1 =