चौफेर न्यूज अपघाताने हातपाय गमावलेल्या जन्मतच अपंगत्व आलेल्या पिंपळे गुरव,सांगवी परिसरातील अपंगांना वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळुन कृत्रिम अवयवाचे रहाटणी येथे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते गोपाळ माळेकर यांनी स्वत:चा वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळुन अपंगांना कृत्रिम अवयवांचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते वाटप केले.

पिंपळे गुरव येथील रितेश भंडारी या तरूणाचा सहा महिन्यापुर्वी रेल्वे प्रवासात अपघात झाला. रितेशला यात दोन्ही पाय गमवावे लागले होते.त्यास जयपुर फुट कृत्रिम अवयव देण्यात आले आहेत. कृत्रिम पायाच्या मदतीने तो स्वता:ची कामे करू शकणार आहे. तर जन्मत:च पायाने अपंग असलेल्या संजु जगधने यास बुट देण्यात आले. महेश अडागळे यास स्टील कँलिपर देण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्या आदिती निकम यांच्या पुढाकाराने कृत्रिम अवयवांचे गरजुंना वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या परिसरातील अनेकजणांपर्यंत परिस्थितीमुळे शासकीय मदत व योजना पोचत नाहीत. काही ना काही कारणाने अपंगत्व आलेल्या गरजु व्यक्तिंपर्यंत मदत पोचवली पाहिजे. केवळ शासकीय योजनांवर अवलंबुन न राहता समाजातील दानशुर व्यक्तींनी अशा कामात पुढे यायला पाहिजे.

यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात आले. यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अरूण पवार,”ग” प्रभाग अध्यक्ष बाबा त्रिभुवन, संदिप नखाते, संदिप गाडे, राज तापकिर, नरेंद्र माने, नगरसेविका सविता खुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

12 + seven =