चौफेर न्यूज –  पिंपळे सौदागर येथील स्मशान भूमीमागील पत्राशेड मध्ये खुलेआम पैसे लावून सुरु असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने छापा मारला. यावेळी जुगार खेळणाऱ्या तेरा जणांवर कारवाई करुन  ४५ हजार २०० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पोपट धर्मराज धेंडे, भारतकुमार लखन पंडित, संदीप सुरेश कांबळे, अरविंद नागनाथ साबळे, विकास परमेश्वर वामने, सागर दिनकर मोरे, संदीप अंबादास साळवे, प्रविण भारत मस्के, शिवाजी बाळासाहेब बाबर, निलेश विश्वानाथ शिंदे, सुखदेव बाबुराव सोनवणे , इब्राहिम जावेद खान आणि दिलीप महातप्पा स्वामी या तेरा जणांवर मुंबई जुगार कायद्यानुसार कारवाई केली आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

6 + 20 =