चौफेर न्यूज – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने (ईपीएफओ) पीएफ काढण्याबाबतचा आपला निर्णय मागे घेतला आहे. दहा लाखांहून अधिक पीएफ क्लेम करण्यासाठी केवळ ऑनलाइन अर्ज करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. आता ऑनलाइनसोबतच ऑफलाइन अर्ज देखील स्वीकारले जाणार आहेत.

ऑनलाइन अर्ज करताना खूप अडचणी येत असल्याची तक्रार पीएफ खातेधारकांकडून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर हा नियम शिथिल करण्यात आल्याचे परिपत्रक ईपीएफओने सर्व कार्यालयांना पाठविले आहे. ईपीएफओने आपल्या निर्णयापासून यू टर्न घेतल्यामुळे आता खातेधारकांना दहा लाखाहून अधिक पीएफ रक्कम काढण्यासाठी ऑनलाइनसोबत ऑफलाइन अर्जही करता येणार आहेत.

ऑगस्ट महिन्यापासून देशभरातील पीएफ कार्यालये पेपरलेस करण्याचे उद्दिष्ट ईपीएफओने निश्चित केले आहे. त्यानुसार पीएफ खात्यातून दहा लाखांहून अधिक रक्कम आणि कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेतून (ईपीएस) पाच लाख रुपयांहून अधिक रक्कम काढण्यासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारण्याचा निर्णय ईपीएफओने घेतला होता. मात्र, अनेक खातेधारकांना ऑनलाइन अर्ज करताना अडचणी येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर ईपीएफओने आपल्या निर्णयापासून यू टर्न घेत खातेधारकांना ऑनलाइन पद्धतीप्रमाणेच ऑफलाइन अर्ज करण्याची मुभा दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × three =