चौफेर न्यूज –  पुणे महानगर परिवहन महामंडळाची पीएमपीएमएल बस आगीत जळून खाक झाली. सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. ही घटना  बुधवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास चिंचवडगांव येथे घडली.

चिंचवडगावत पीएमपीएमएलचे बस स्थानक आहे. एमएच 12 एचबी 401 या क्रमाकांची पीएमपीएमपीएल बस चिंचवड स्थानकात आली होती. स्थानकाबाहेर बस उभी होती.  त्यावेळी पावणेदोनच्या सुमारास या बसला अचानक आग लागली. ही आग एवढी मोठी होती की धुराचे लोटच्या लोट बाहेर येत आहेत. त्यामुळे परिसरात काहीकाळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

संत तुकारामनगर येथील अग्निशामन दलातील बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. यामध्ये पीएमपीएल बस जळून खाक झाली आहे. आग कशामुळे लागली होती याचे नेमके कारण अद्यापर्यंत समजू शकले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seventeen − fifteen =