चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात गुरुवारी व शुक्रवारी (दि. 15 व 16 फेब्रुवारी) आंतरराष्ट्रीय शिक्षक विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पीसीईटी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या परिषदेत ‘माहिती संकलन शास्त्र आणि यांत्रिक बुध्दीमत्ता’ (Data Science and Machine Intelligence) या विषयावर ऑस्ट्रेलियातील एडिथ कोवन विदयापिठाच्या डॉ. लिसा आर्मस्ट्रॉंग, डॉ. अमिया त्रिपाठी, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. ए.एम.फुलंबरकर, पीसीसीओईच्या आयटी विभाग प्रमुख डॉ. स्वाती शिंदे, नांदेडचे डॉ. उदय कुलकर्णी आदी मार्गदर्शन करणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार कार्यक्रमा अंतर्गत हा कार्यक्रम होणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × 3 =