लोणावळा,   : एका अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटार सायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खंडाळ्यातील अमृतांजन पुलाजवळ झाला आहे. 

    संजय मारुती रसाळ (वय-40, रा. अंजरून, खालापूर, रायगड), विक्रम प्रकाश सोरटे (वय-27, रा. मोहनवाडी, खोपोली, रायगड) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

    लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री अकराच्या सुमारास पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका मोटार सायकलला अज्ञात वाहनाने मागील बाजूस धडक दिली. या धडकेमुळे झालेल्या अपघातात मोटार सायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.  सहा. फौजदार एस. बि. शिंदे हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

7 + two =