चौफेर न्यूजपुणे शहराचा सांस्कृतिक मानबिंदू असणाऱ्या बालगंधर्व रंगमंदिराची आत्ताची वास्तू पूर्णपणे पाडून नवीन वास्तू उभारण्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून काही रंगकर्मींना आत्ताची वास्तू नेस्तनाबूत करुन नवीन इमारत बांधण्याची खरच गरज आहे? असा सवाल उपस्थित करत या योजनेवर आक्षेप घेतले आहेत.

पुणे शहराचा सांस्कृतिक वारसा सांगणारी वास्तू म्हणजे बालगंधर्व रंगमंदिर. पण ५० वर्षानंतर ही वास्तू पाडून तिथे आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर होणार आहे. पु. ल. देशपांडे यांच्या कल्पनेतून बालगंधर्व रंगमंदिर हे साकारले असल्यामुळे ही वास्तू फक्त पुणेकरांसाठीच नाही तर समस्त नाट्यप्रेमींसाठी महत्त्वाची आहे. काही कलाकारांनी हे सांस्कृतिक केंद्र पुनर्विकसित करण्याच्या पालिकेच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. नाटककार अतुल पेठे, ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी या निर्णयावर नापसंती दर्शवली आहे. १९६२ साली बालगंधर्व रंगमंदिर संभाजी बागेच्या जागेत उभारण्यात आले आणि येथे १९६८ सालापासून नाटक नांदू लागले. ५० वर्षांनंतर आता या वास्तूची ‘एक्स्पायरी’ झाल्याने आता ‘अपडेटेड’ इमारत उभे राहणे गरजेचे असल्याची पालिकेची भूमिका असून कलाकारांच्या सल्ल्यानेच नवीन इमारतीचा आराखडा तयार केला जाईल अशी ग्वाही पालिकेकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

9 + eight =