शेखर ओव्हाळ युवा मंचचा उपक्रम

पिंपरी :  कासारवाडी, दापोडी आणि फुगेवाडी परिसरातील पुरबाधित नागरिकांसाठी आयोजित आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शेखर ओव्हाळ युवा मंच, पवना मेडिकल फाउंडेशन आणि पवना हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पूरबाधितांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारपासून (दि. ९) हे शिबीर सुरू असून दररोज १३०० ते १४०० नागरिक शिबिराचा लाभ घेत आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी, कासारवाडी, फुगेवाडी यासह अन्य भागात काही दिवसांपूर्वी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. घरा-घरांत पाणी शिरून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. अन्य गैरसुविधांबरोबरच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला होता. त्यामुळे आजारी पडण्याचा प्रकार वाढू लागला. या पार्श्वभूमीवर शेखर ओव्हाळ युवा मंचने पुढाकार घेऊन आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले.

या शिबिरात ब्लड प्रेशर, शुगर यासह सामान्य तपासणी करण्यात येत आहे तसेच मोफत औषधेही पुरविली जात आहेत. शिबिराला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. हे शिबीर आणखी ६ दिवस चालणार असून याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शेखर ओव्हाळ यांनी केले आहे . शिबिरासाठी पवना हॉस्पिटलचे डॉ. प्रमोद निकम, डॉ. अभिषेक लाड, डॉ. प्रीती हजारे, डॉ. निपुण जाधव यांच्यासह शेखर ओव्हाळ युवा मंचचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × 5 =