निगडी ः माहेरहून पैसे आणावेत म्हणून सासरच्या मंडळींनी विवाहितेस शिवीगाळ तसेच लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. याघटनेत महिलेचा हात आणि दात तुटले असून डोळ्याला देखील गंभीर इजा झाली आहे. ही घटना शुक्रवार (दि.12) रात्री दिडच्या सुमारास निगडी त्रिवेणीनगर झोपडपट्टी चर्चसमोरील पाण्याच्या टाकीजवळ घडली. याप्रकरणी पिडित 28 वर्षीय विवाहितेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विलास गायकवाड आणि बायडाबाई गायकवाड (दोघे रा. त्रिवेणीनगर झोपडपट्टी, निगडी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास आरोपी विलास आणि बायडाबाई यांनी त्यांच्या 28 वर्षीय सुनेला माहेरहून पैसे न आणल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने कपाळावर, तोंडावर आणि हातावर जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. याघटनेत सुनेचा हात आणि दात तुटले असून डोळ्याला देखील गंभीर इजा झाली आहे. तसेच तिला जाळून टाकण्याची धमकी देखील आरोपींनी दिली. याप्रकरणी आरोपी विलास आणि बायडाबाई या दोघांना अटक करण्यात आली आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × 3 =